कवडसा .....
रानीवनी भटकलो
पालथी गेली दुनिया
तरी नाही ग मी थकलो.
आयुष्यात येऊन सखे ,
मन झाले माझे नंदन
तुझ्या प्रीतीचा ग सुगंध
फिके पडले हे चंदन .
मुग्ध पानांच्या वर्षावात
तुझा स्पर्श जाणवतो
खट्याळ मित्र तुझा वारा
तराना गुंफाया लावतो.
तुझ्या भाळीचा ग कुंकू ,
जणू पूर्वेचा हा लालिमा
रूप काय तुझे वर्णावे ,
सौंदर्याची तू असीमा.
सखे तुझा केश्श्रुन्गार ,
जणू लाटांचा हेलकावा
तुझ्या वदनाचे लावण्य ,
शशीही करेल हेवा.
केवळ एक ईशकृपा
तू रंग भरावे जीवनी
प्रीतीचा तू इंद्रधनू ,
स्वप्नातली तू यौवनी .
कवडसा बनून मी ग
येईन तुझला भेटाया
आनंदाने भिजले मन
तयार हो या स्वागतया ...........
-अनामिका