Thursday, October 20, 2011

नशिबाबाहेरचे........

आजही आठवतंय ......
तुझ पहिलं वहिल  पाऊल जेव्हा पडल माझ्या घरात
पोह्याचं छोट ताट ,अन दुध कमी एक कप चहात
३ तासांच्या लोड शेडींग मध्ये डोळाभरून साठवलं तुला
बोलायचे राहून गेलं काहीतरी ,फार उशिरा कळलं मला

आजही आठवतंय ......

शंका नसतानाहि मध्यरात्री केलेला फोन 
अन झोपेतच तू म्हणाला कोण बोलताय कोण?
तुझा प्रत्येक शब्द उत्तर असायचे माझं
किती राहशील दूर किती आठवांचे ओझं

आजही आठवतंय ......

तू हसता हसता काहीतरी बोलून गेलास
अन जगण्यासाठी आयुष्यागान देऊन गेलास

आजही आठवतंय ......

लाडामध्ये   एकदा बरेच काही बोलले
का कुणास ठाऊक तुझ्या मनाला ते रुतले  
तुझ्या त्या रागात प्राजक्त झले मी
जगण्याच्याच अर्थाला मुकले मी

आजही आठवतंय ......

माझा हट्ट तुला पुन्हा पुन्हा भेटण्याचा
"खूप खूप चुकले माझे" ,रेटण्याचा

आजही आठवतंय ......

समजूत कधी तू दिलीच नाही
शब्दाविना कळले मला सर्वकाही
तुझा अबोला खूप मोठ शल्य होत
माहित नाही माझ्या प्रीतीला काही मूल्य होत??

आजही आठवतंय ......

चांदण्यांकडे मागायचे तुला
पापण्यांकडे मागायचे तुला
"नशिबाबाहेरचे मिळत नाही काही "ते सांगायचे मला

आजही आठवतंय ......

तुझ्या प्रत्येक शब्दाला आठवायचे  मी
शब्दांमध्ये सूर जुळवायचे मी
पण तुटलेल्या माळेसारखे गीत कसे तुटले
तुझ्या माझ्यामध्ये सांग आता काय उरले

आजही आठवतंय ......

तुझी पाहिलेली आतुरतेने वाट
ध्यानी मनी तुझ्या स्वप्नांचा थाट
तुझ्या आयुष्याच्या वाटेवर नाही मिळणार
माझ्या आयुष्याला वाट

आजही आठवतंय ......

तुला विसरण्याचा केलेला खटाटोप
स्वताने स्वतावर केलेले आरोप
सरते शेवटी डोळ्यावर पाणी ओढून घेतले
तू नाही आयुष्यात माझ्या
जणू कुणी माझ्यातले "मीपण " काढून घेतले 
                                    :अनामिका

Sunday, April 24, 2011

तो

काय  सांगू असा बरसला तो शहाणा 
मला बाहेर नेण्याचा  त्याचा  खोटा बहाना
अशा अवखळ  सरी त्याच्या 
जणू माळा माणिक मोत्याच्या 
खोडकर सख्याने अशी खोडी केली
नकळत झाले मी चिंब चिंब ओली
आला कधी गेला कधी कळलेच नाही 
कानात गुपित सांगून गेला भलतेच काही 


Saturday, March 19, 2011

रंग..

एक रंग असा एक रंग तसा
रंगात रंगतो जीव इवलासा 
नाचू दे भिरभिर  आज अंगणी 
रंगा भिजू दे सारी अवनी 

Wednesday, February 16, 2011

विरहाचा एक शब्द ..........


अशी हुरहुर जीवा लावी सख्या 
तुझ्या या गोड आठवणी
जगण्याचा आधार बनली 
तुझी ती गोड गाणी 

हळूच ये स्वप्नात माझ्या 
नकळत पापण्यांच्या 
काहुर मनी,चाहुल तुझी 
बागेत नव्या स्वप्नांच्या 

विरह तुझा सोसू कशी 
काटेरी सख्या हा दुरावा 
तुझ्यात विर्घलताना मी 
फ़क्त एक क्षण उरावा ...................
                          -anamika

Tuesday, December 21, 2010

द्वितीया

कवडसा .....

शोधीत धुक्यात तुझला,
 रानीवनी भटकलो 
पालथी गेली दुनिया 
तरी नाही ग मी थकलो.
आयुष्यात येऊन सखे ,
मन झाले माझे नंदन 
तुझ्या प्रीतीचा ग सुगंध
 फिके पडले हे चंदन .
मुग्ध पानांच्या वर्षावात 
तुझा स्पर्श जाणवतो
खट्याळ मित्र तुझा वारा
 तराना गुंफाया लावतो.
तुझ्या भाळीचा ग कुंकू ,
जणू पूर्वेचा हा लालिमा
रूप काय तुझे वर्णावे ,
सौंदर्याची तू असीमा.
सखे तुझा केश्श्रुन्गार ,
जणू लाटांचा हेलकावा 
तुझ्या वदनाचे लावण्य ,
शशीही करेल हेवा. 
केवळ एक ईशकृपा
 तू रंग भरावे जीवनी 
प्रीतीचा तू इंद्रधनू ,
स्वप्नातली तू यौवनी .
कवडसा बनून मी ग 
येईन तुझला भेटाया
आनंदाने भिजले मन
 तयार हो या स्वागतया ...........
                              -अनामिका

पहिला शब्द .........

.

...................."बोल त्याचे" 

भावूक  मनाचा भाव कसा कळेना तुला 
जवळ असूनही का तुझा अबोला 
तुझ्या डोळ्यातल्या शब्दांना गुंफू दे 
माझ्याही डोळ्यांना तुझ्या स्वप्नांसाठी झोपू दे 
हातात दे हात जरा ,मारू गप्पा थोड्या 
वाट तर सरायची आहे ,घाई नको गड्या
कसे सांगू वाऱ्याला  थांब थोडा ,वाहू नको जोरात 
नाजूक बोल उडतील तुझे ,साठवू दे ऊरात 
                                     -अनामिका